Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»निवडणूक»राज्यसभेवर राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड निश्चित; मविआने उमेदवार न दिल्याने मार्ग मोकळा
निवडणूक

राज्यसभेवर राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड निश्चित; मविआने उमेदवार न दिल्याने मार्ग मोकळा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई, दि. ८ जून : राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत महायुतीकडून राजेंद्र जैन यांचाच अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल झाला असून महाविकास आघाडीकडून एकही उमेदवार रिंगणात उतरला नाही.

राज्यसभेच्या या जागेसाठी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला असला तरी मंगळवारी होणाऱ्या छाननी प्रक्रियेत तो तांत्रिक कारणांमुळे बाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जैन यांच्या निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक राहिल्याचे मानले जात आहे.

ही जागा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभा सदस्यत्वामुळे निर्माण झाली होती. महायुतीने या जागेसाठी राजेंद्र जैन यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे.

प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू सहकारी

पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रभावी नेते म्हणून ओळख असलेल्या राजेंद्र जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दीर्घकाळ काम केले आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय आणि एकेकाळचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. पक्ष संघटनेत त्यांनी मजबूत स्थान निर्माण केले असून विदर्भातील राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.

यापूर्वी त्यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठविण्यात आले होते. मात्र २०१६ मधील विधान परिषद निवडणुकीत त्यांचा भाजपचे परिणय फुके यांच्याकडून पराभव झाला होता. आता राज्यसभेच्या माध्यमातून त्यांची राष्ट्रीय राजकारणात एंट्री होणार आहे.

छगन भुजबळांची सूचक नाराजी

राज्यसभेच्या या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता दिसून आली. या जागेसाठी ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र पक्षाच्या कोअर कमिटीने अखेर राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी सूचक शब्दांत नाराजी व्यक्त केली. “आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, असे आमचे धोरण आहे,” असे म्हणत त्यांनी परिस्थिती स्वीकारल्याचे सांगितले. तसेच, “मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धीबळाचा नाही,” या वक्तव्याद्वारे पक्षातील अंतर्गत राजकारणावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले.

राजेंद्र जैन यांच्या राज्यसभेवरील संभाव्य निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भातून राष्ट्रीय पातळीवर आणखी एक प्रभावी प्रतिनिधी मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी तपपूर्ती निमित्त मंगळवारी पुण्यात “नरसिंह महायज्ञ
Next Article विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच अधिकाऱ्यांसमवेत घेतली बैठक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विधानपरिषद निवडणुक: माजी आमदार विलास लांडे यांच्या उमेदवारीसाठी जोरदार ‘लाॅबिंग’

May 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?