Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत खळबळ; ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’ – शरद लोणकर यांचा आरोप
महाराष्ट्र

मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत खळबळ; ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’ – शरद लोणकर यांचा आरोप

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 4, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

महामंडळातील प्रस्थापितांविरोधात आठ अपक्षांची मोट; सदस्यांच्या हितासाठी लढण्याचा निर्धार

पुणे, प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांनी प्रस्थापित गटांवर जोरदार हल्लाबोल करत निवडणूक वातावरण तापवले आहे. समोरासमोर दिसणारी दोन्ही प्रमुख पॅनल प्रत्यक्षात एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांच्यातील संघर्ष हा केवळ दिखावा असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. महामंडळ आणि सदस्यांच्या हितासाठी आठ अपक्ष उमेदवारांनी एकत्र येत स्वतंत्र संघ उभारल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेला दिग्दर्शक अमोल भावे, निर्माता महादेव शिरोळकर, मानसिंग कदम, कला दिग्दर्शक उल्हास लांडगे यांच्यासह अपक्ष संघाला पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्री व निर्मात्या भाग्यश्री देसाई उपस्थित होत्या. अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि शाहीर संभाजी भगत यांच्यासह अनेक मान्यवरांचा पाठिंबा असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.

शरद लोणकर म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून महामंडळाच्या कारभारात असलेल्या संचालकांनी चित्रपटसृष्टीतील मूलभूत प्रश्न सोडवण्याऐवजी अंतर्गत राजकारण आणि गटबाजीवर भर दिला. दोन्ही प्रमुख पॅनलमधील अनेक उमेदवार पूर्वी एकत्र काम करणारे असून काहींना बिनविरोध निवडून आणण्यासाठी परस्पर सहकार्य केल्याचे दिसून येते. त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ‘मिलीभगत’ असल्याचा आरोप त्यांनी केला.

महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप नसल्याचा दावा फेटाळून लावत त्यांनी काही उमेदवार आणि राजकीय नेत्यांमधील संबंध सर्वश्रुत असल्याचे सांगितले. निवडणूक प्रक्रियेवर राजकीय प्रभाव कायम असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वितरण आणि प्रसिद्धी विभागातून निवडणूक लढवत असलेल्या लोणकर यांनी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्धी व वितरण क्षेत्रातील आर्थिक शोषणावरही बोट ठेवले. आपण गेली चार दशके अनेक चित्रपटांसाठी विनामूल्य प्रसिद्धीचे काम केले असून उद्योगातील हितासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘सभासद, कलाकार आणि तंत्रज्ञांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष’

दिग्दर्शक अमोल भावे यांनी गेल्या दशकातील महामंडळाच्या कारभारावर टीका करत सभासद, कलाकार आणि तंत्रज्ञांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कलाकारांसाठी निवास व्यवस्था आणि वृद्धाश्रम उभारण्यासाठी दिलेल्या जागेवर अद्याप कोणतेही ठोस काम झाले नसल्याचे त्यांनी नमूद केले. महामंडळाच्या निधीचा वापर कार्यालयांसाठी करण्यात आला, मात्र कलाकारांच्या कल्याणासाठी अपेक्षित उपक्रम राबवले गेले नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

निर्माता महादेव शिरोळकर यांनी महामंडळाच्या घटनेतील बदल, मालमत्ता निर्मिती आणि आर्थिक निर्णयांविषयी सभासदांना पुरेशी माहिती दिली जात नसल्याचा आरोप केला. पुणे महापालिकेकडून अत्यल्प भाडेतत्त्वावर उपलब्ध होऊ शकणारी जागा नाकारून स्वतंत्र कार्यालयांवर मोठा खर्च का करण्यात आला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘मतदार यादीत मोठा घोटाळा; ४० हजार मतदार वंचित’ – भाग्यश्री देसाई

अभिनेत्री व निर्मात्या भाग्यश्री देसाई यांनी मतदार यादीच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या, “जाणूनबुजून काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. मी स्वतः अनेक वर्षे मतदार होते, मात्र यंदा माझे नाव यादीतून वगळण्यात आले. मृत व्यक्तींची नावे मात्र कायम ठेवण्यात आली असून त्यांच्या नावावर बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.”

सुमारे ४० हजार संभाव्य मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करत देसाई यांनी चित्रपटसृष्टीशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे सांगितले. “महामंडळात गुंडा-कुंडांचा मुजोर कारभार सुरू असून चांगली आणि प्रामाणिक माणसे सत्तेत यावीत म्हणून मी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महामंडळाच्या निवडणुकीत यंदा परिवर्तनाची लाट निर्माण करण्याचा दावा अपक्ष संघाने केला असून प्रस्थापित गटांविरोधातील या आरोपांमुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराष्ट्रीय ई-शासन पुरस्कारांमध्ये नंदुरबार, पुणे आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड
Next Article विकसित भारतासाठी कौशल्यसंपन्न मानव संसाधनाची निर्मिती हीच काळाची गरज -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

June 29, 2026

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?