Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»वडार समाजाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – मंत्री अतुल सावे
महाराष्ट्र

वडार समाजाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – मंत्री अतुल सावे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई, : वडार समाजासाठी पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. या महामंडळामार्फत वडार समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.

राज्यातील वडार समाजाच्या प्रलंबित विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. बैठकीला आमदार अभिमन्यू पवार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.

“इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत वडार समाजासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. समाजातील नागरिकांनी जनजागृती करून विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच राज्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या इतर मागास प्रवर्गाच्या वसतिगृहांमध्ये वंचित घटकांसाठी आरक्षण उपलब्ध असून वडार समाजातील विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा”
……….मंत्री अतुल सावे

वडार समाजातील बेघर कुटुंबांसाठी घरकुल योजनेच्या निधीत वाढ करणे, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या २.५ लाख रुपयांच्या अनुदानासोबतच, राज्याच्या कामगार कल्याण मंडळामार्फत पात्र बांधकाम कामगारांना नवीन घरकुलासाठी अतिरिक्त २ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाने कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश मंत्री सावे यांनी दिले.

वडार समाजाचा पारंपरिक व्यवसाय दगडफोड, खाणकाम आणि मातीकामाशी संबंधित असल्याने जिल्हापरिषद, महानगरपालिका आणि पंचायत समिती स्तरावरील काही कामे समाजासाठी राखीव ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेने वडार समाज सेवा संघ’ यांना २० गुंठे जागेवर विद्यार्थ्यांसाठी भव्य वसतिगृह उभारण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. तसेच वडार समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रे सुलभपणे मिळावीत यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाला देण्यात आले.

या बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालिका सोनाली मुळे, अखिल भारतीय महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे कार्याध्यक्ष पिराजी मंजुळे, भाजप भटके विमुक्त आघाडीचे सरचिटणीस रविंद्र शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवंचित समाजाला शासकीय प्रमाणपत्रे देण्यासाठी व्यापक मोहीम राबविणार – मंत्री अतुल सावे
Next Article बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश गिरिशिखरांवरून देणारी ग्रिहीथा; ११व्या वर्षीच शंभरहून अधिक गडक्कीले सर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

June 29, 2026

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?