सातारा : राज्यातील घरकुल बांधकामाला गती देण्यासाठी १६ लाख घरांच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले असून त्यामुळे रखडलेल्या कामांना वेग मिळणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
ते म्हणाले, साखरेची एमएसपी वाढविल्यास ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळेल. भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी एक लाख रुपयांपर्यंत मदत देण्याचा निर्णयही महत्त्वाचा ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, महाराष्ट्राला एका वर्षात ३० लाख घरांचे उद्दिष्ट देण्यात आले असून ४५ दिवसांत २८ लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्याने एका वर्षात ५ लाख ८ हजार घरे पूर्ण करून विक्रम केला आहे. यंदा १५ लाख घरे पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पाच लाख घरकुलांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच ८ हजार ३६८ कोटी रुपयांच्या निधी उपलब्धतेचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान करण्यात आला.कार्यक्रमात महाआवास अभियान २०२३-२४ अंतर्गत विविध विभाग, जिल्हे, तालुके आणि ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले.
