Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मनोरंजन»ऊर्जा बचत धोरणाबाबत महापालिकेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
मनोरंजन

ऊर्जा बचत धोरणाबाबत महापालिकेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 13, 2026Updated:May 14, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
पिंपरी, दि. १३ मे २०२६ : महापालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा बचतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम हे केवळ अभ्यास, अहवाल आणि सादरीकरणांपुरते मर्यादित राहता कामा नयेत. प्रत्यक्ष अंमलबजावणीतून वीज वापरात लक्षणीय बचत आणि कार्यक्षम ऊर्जा व्यवस्थापनाचे ठोस परिणाम दिसून येणे गरजेचे आहे. त्यासाठी वेळबद्ध कृती आराखडा तयार करून ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धन, आर्थिक बचत आणि शाश्वत विकास या तिन्ही उद्दिष्टांचा समतोल साधणारी कार्यपद्धती महापालिकेने स्वीकारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब करून वीज बचत, खर्च नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धन साध्य करण्याच्या उद्देशाने ऊर्जा बचत धोरणांतर्गत विविध उपाययोजनांबाबत महत्त्वपूर्ण बैठक पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात संपन्न झाली. या बैठकीत महापालिकेच्या विविध प्रशासकीय इमारतींमधील एसी यंत्रणा, वॉटर पंप तसेच अन्य विद्युत उपकरणांच्या ऊर्जा वापराचे व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, उप आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संतोष दुर्गे तसेच एशियन डेव्हलपमेंट बँक (ए.डी.बी), अलांयन्स् फॉर एनर्जी इफिशिएंट इकॉनॉमी (ए.इ.इ.इ) आणि कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरोमेंट अँड वॉटर (सी.इ.इ.डब्ल्यू) या संस्थांचे प्रतिनिधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अलांयन्स् फॉर एनर्जी इफिशिएंट इकॉनॉमी (ए.इ.इ.इ) सोबत यापूर्वीच सामंजस्य करार केला असून त्या अंतर्गत अलांयन्स् फॉर एनर्जी इफिशिएंट इकॉनॉमी (ए.इ.इ.इ), एशियन डेव्हलपमेंट बँक (ए.डी.बी) आणि कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरोमेंट अँड वॉटर (सी.इ.इ.डब्ल्यू) यांच्या संयुक्त विद्यमाने ऊर्जा कार्यक्षमतेसंदर्भातील अभ्यास आणि नियोजन प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या ऊर्जा वापराचे विश्लेषण, ऊर्जा बचतीच्या संधींचा शोध, आर्थिक व्यवहार्यता तसेच आवश्यक निधी संरचना याबाबत विविध टप्प्यांमध्ये काम करण्यात येत आहे. बैठकीमध्ये इन्सेप्शन रिपोर्ट, महापालिकेच्या वित्तीय स्थिती व ऊर्जा खर्च विश्लेषण अहवाल, प्राथमिक आर्थिक मॉडेल व व्यवसाय आराखडा, निधी संरचना अहवाल, प्री-फिजिबिलिटी स्टडी तसेच अंतिम आर्थिक मॉडेल आणि अंतिम प्री-फिजिबिलिटी स्टडी अहवाल या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर संगणकीय सादरीकरण करण्यात आले आणि त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत ऊर्जा बचत उपाययोजनांसाठी आवश्यक असलेल्या गुंतवणुकीचे विविध पर्याय, निधी उभारणीची संरचना तसेच अंमलबजावणीची कार्यपद्धती याबाबत चर्चा करण्यात आली. ऊर्जा कार्यक्षम प्रकल्पांची अंमलबजावणी करताना दीर्घकालीन शाश्वतता, आर्थिक व्यवहार्यता आणि प्रत्यक्ष ऊर्जा बचतीचे मोजमाप यावर विशेष भर देण्याच्या सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. तसेच केवळ अहवाल आणि अभ्यासापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देऊन ऊर्जा बचतीची ठोस परिणामकारकता दिसून यावी, यासाठी वेळबद्ध नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

“ऊर्जा बचत ही केवळ आर्थिक गरज नसून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. महापालिकेच्या इमारतींमध्ये आधुनिक ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर करून वीज खर्चात बचत करणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विविध संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून महापालिकेची ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम, आधुनिक आणि परिणामकारक होईल, असा विश्वास आहे.“

– डॉ. विजय सूर्यवंशी,आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Next Article कांद्याला मातीमोल भाव; संतप्त शेतकऱ्याने मार्केट कमिटी गेटवर कांदा ओतला
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

समाज जीवनाच्या घुसळणीतून नवनीत म्हणून पुढे येते तेच असते साहित्य – योगेश सोमण

June 29, 2026

अकोला पीक विमा प्रकरणाचा तपासणी अहवाल सादर करा – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

June 10, 2026

कोरिया-भारत संबंधासाठी पीसीयूचा कोसमे पुणे बेस कॅम्प महत्वपूर्ण – कोरिया प्रजासत्ताक महावाणिज्य दूत डोंगवान यू 

June 4, 2026

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकाची तिकिटे ‘तिकीटालय’ ॲपवर उपलब्ध होणार – मंत्री ॲड. आशिष

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

दि चिल्ड्रेन एड सोसायटी नियामक मंडळाची बैठक मुंबई, प्रतिनिधी: दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या मुंबई शहरात…

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?