Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»परिवहन»दिवाळीत एसटीला प्रवाशांची विक्रमी पसंती! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
परिवहन

दिवाळीत एसटीला प्रवाशांची विक्रमी पसंती! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अवघ्या १६ दिवसांत ५४८ कोटींचे उत्पन्न;दिवाळीच्या परतीच्या प्रवासात एकाच दिवसात ४६.५३ कोटींची विक्रमी कमाई!

मुंबई, दि. १७ नोव्हेंबर  : दिवाळीचा आनंद, सलग सुट्ट्यांची पर्वणी आणि गावी जाण्यासह परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) लालपरीला भरभरून पसंती दिली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या १६ दिवसांत एसटीने तब्बल ५४८ कोटी २२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले असून, दररोज सरासरी ३४ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, दिवाळी सणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी परतीच्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे एसटीने एकाच दिवसात ४६ कोटी ५३ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवण्याचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. एसटीच्या या विक्रमी कामगिरीबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी राज्यातील प्रवाशांचे आभार मानले आहेत.

ऑक्टोंबर महिन्यात महिला सन्मान योजनेच्या अंमलबजावणीतील सक्तीमुळे तसेच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला होता. मात्र, नोव्हेंबर महिन्यात दिवाळी सण, सलग सुट्ट्या, प्रवाशांची वाढलेली संख्या आणि महिला सन्मान योजनेच्या अंमलबजावणीत देण्यात आलेली शिथिलता यामुळे एसटीच्या उत्पन्नाला मोठी चालना मिळाली आहे.

यंदाच्या दिवाळी हंगामातील आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे दरवर्षी गर्दीच्या हंगामात आकारली जाणारी हंगामी भाडेवाढ यंदा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे सणासुदीच्या काळातही प्रवाशांना नेहमीच्याच तिकीट दरात प्रवास करता आला. खासगी वाहतुकीच्या तुलनेत सुरक्षित, विश्वासार्ह आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय म्हणून एसटीने पुन्हा एकदा आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.

प्रवाशांचा विश्वास आणि एसटी कर्मचाऱ्यांचे परिश्रम यांच्या बळावर लालपरीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. दिवाळीतील हा विक्रमी प्रतिसाद म्हणजे एसटीवरील जनतेच्या अढळ विश्वासाची पावतीच ठरली आहे. असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. त्याचबरोबर सणासुदीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या एसटी महामंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी, चालक आणि वाहक यांचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपालघरला जिल्हा व सत्र न्यायालयाबरोबरच मुख्य दंडाधिकारी न्यायालय होणार
Next Article पिंपरी-चिंचवड, चाकण परिसरात गुन्हेगारी घटनांचा धुमाकूळ; खूनाचा प्रयत्न, मारहाण, अपघातात मृत्यू अन् १५.४० कोटींच्या अपहाराचा गुन्हा!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?