Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील आठ निराधार कुटुंबांना मिळाला हक्काचा निवारा! 
पिंपरी चिंचवड

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील आठ निराधार कुटुंबांना मिळाला हक्काचा निवारा! 

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 11, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

… हे आम्हा पिंपरी- चिंचवडकरांचे उत्तरदायित्व : आमदार महेश लांडगे यांची कृतज्ञतेची भावना

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी….मोशी कचरा डेपो दुर्घटनेत जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना अखेर हक्काच्या घराचा आधार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दुर्घटनेतील आठ दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोशी येथील एसआरए (SRA) प्रकल्पांतर्गत आठ सदनिकांचे वाटप करण्यास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने अधिकृत मान्यता दिली आहे.

भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी या आपत्तीग्रस्त कुटुंबीयांच्या न्याय्य हक्कांसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, या निर्णयामुळे आठ कुटुंबांच्या आयुष्यात सुरक्षिततेचा आणि नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे.

दि. ८ जुलै २०२६ रोजी झालेल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नऊ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. कुटुंबातील कर्ता माणूस गमावलेल्या वारसांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आपल्या माणसाच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नसली, तरी त्यांच्या पश्चात कुटुंबीयांना सन्मानाने जगण्यासाठी हक्काचा निवारा मिळावा, अशी मागणी होती.

या कुटुंबांच्या प्रश्नाकडे केवळ प्रशासकीय किंवा तांत्रिक बाब म्हणून न पाहता मानवी संवेदनशीलतेच्या दृष्टिकोनातून पाहण्याची भूमिका आमदार लांडगे यांनी घेतली. दुर्घटनेत जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना न्याय मिळवून देणे ही केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर समस्त पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने आपली नैतिक जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत संबंधित आठ वारसांना यशवंतनगर, पिंपरी येथील एसआरए प्रकल्पातील सदनिकांचे वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे. नऊ पैकी आठ कुटुंबांना हक्काचा निवारा मिळाला आहे. उर्वरित एका कर्मचाऱ्याच्या वारसांची कागदपत्रांची पूर्तता करणे बाकी आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील त्या वेदनादायी आठवणी आजही मन हेलावून टाकतात. शहरासाठी कर्तव्य बजावताना जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांच्या हक्कांसाठी प्रयत्न करणे आणि त्यांना सुरक्षित निवारा मिळवून देणे, हे पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने आमचे सामाजिक उत्तरदायित्व होते. आज त्या उत्तरदायित्वाची पूर्तता होत असल्याचे समाधान आहे.

यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका विधी समितीच्या सभापती सुजाता बोराटे, क-प्रभागाचे अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे, अ-प्रभागाच्या अध्यक्षा अर्चना सस्ते, नगरसेविका सौ. सारिका गायकवाड, नगरसेवक सचिन तापकीर, सामाजिक कार्यकर्ते राजेश सस्ते, नीलेश बोराटे, रवींद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

दरम्यान, या संवेदनशील विषयात सकारात्मक भूमिका घेत निर्णयप्रक्रियेला सहकार्य करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आमदार लांडगे यांनी आभार मानले.

“गेलेला माणूस आपण परत आणू शकत नाही. त्या कुटुंबांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळीही कधी भरून निघणार नाही. मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या त्या कटू आठवणी आजही मनात जशाच्या तशा आहेत. मात्र, त्या संकटात सापडलेल्या कुटुंबांना एकटे पडू न देणे, त्यांच्या हक्कासाठी उभे राहणे आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी आधार मिळवून देणे, हे समस्त पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने आमचे उत्तरदायित्व होते. ही आपल्या शहरासाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांप्रती व्यक्त केलेली ही कृतज्ञता आहे. नऊपैकी आठ कुटुंबांना हक्काचा निवारा मिळाला. एका कुटुंबाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर या शहराचा एक जबाबदार नागरिक म्हणून हे कर्तव्य पार पाडणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते.”

______महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसम्यक स्वयंसेवा संस्थेकडून पिंपरी-चिंचवड डिजिटल पत्रकार संघाची दिवाळी गोड!
Next Article सफाई कर्मचाऱ्यांच्या घामाला राष्ट्रीय सन्मानाची पावती!औद्योगिकनगरी बनली स्वच्छनगरी; पिंपरी-चिंचवडचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

November 23, 2026

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026

अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणार; पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी शासन खंबीरपणे पाठीशी!

November 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 23, 20260

पिंपरी, प्रतिनिधी  : पिंपरी-चिंचवड शहराची विकासात्मक वाटचाल, नागरी सुविधांचे नियोजन, बदलती लोकसंख्या आणि भविष्यातील शहरी…

‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेच्या कलाकारांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान

November 23, 2026

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची पक्ष नेतृत्वाकडे कैफियत; सचिन काळभोरांचा सवाल – माझा गुन्हा काय?

November 23, 2026

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची माणुसकी अन् कर्तव्यदक्षतेचे दर्शन! चक्कर आलेल्या महिला प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल

November 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?