Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मुंबई»मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे दालन उभारणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई

मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे दालन उभारणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

मुंबई, प्रतिनिधी : मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे दालन उभारण्यासाठी शासन पुढाकार घेईल. सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून हे दालन उभारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित आणि ग्रंथाली प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, ग्रंथाली प्रकाशनचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, संपादक प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, व्यंगचित्रकला ही एक अशी प्रभावी कला आहे, जिथे एकही शब्द न उच्चारता हवे तेवढे प्रभावी फटके मारता येतात आणि नेमके सांगायचे ते लोकांपर्यंत पोहोचवता येते. कोणत्याही काळातील घडामोडी असोत किंवा विरोधाभास असो, तो सातत्याने व्यंगचित्रांच्या माध्यमातून मांडण्याचे काम मराठी व्यंगचित्रकारांनी केले आहे.

व्यंगचित्रांच्या माध्यमातून संपूर्ण व्यक्तिमत्वाचे दर्शन होते. ही एक विलक्षण कला आहे. जी महाराष्ट्राच्या मातीने आधीपासून जोपासली आहे. ही कला भावी पिढीपर्यंत नेण्यासाठी हे पुस्तक निश्चितच मोलाची भूमिका बजावणार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुस्तकाचे महत्व अधोरेखित केले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनोगतात व्यंगचित्रकलेच्या शैलीतील ‘रीडिंग इन बिटवीन लाईन्स’ म्हणजेच रेषांमधला अर्थ समजावून सांगत व्यंगचित्रकार म्हणून काम करताना आलेले अनुभव, ‘फटकारे’ या पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास तसेच व्यंगचित्रकार हा नेहमीच समाजातील विसंगतीवर चोख बोट ठेवतो, याचे महत्व स्पष्ट केले. शासन पुढाकार घेऊन व्यंगचित्रकारांच्या कलेचे उभारण्यात येणाऱ्या दालनासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढताना रेषांचे महत्व, स्वाभिमान आणि अचूक टिपण असावे , असे सांगत जुन्या काळातील व्यंगचित्रविश्वातील आठवणींना उजाळा दिला. संस्कृती आणि कलेच्या व्यासपीठावर एकत्र येणे ही महाराष्ट्राची जुनी परंपरा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या ग्रंथाच्या निर्मितीमागील प्रचंड परिश्रमांचे कौतुक केले. व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी आणि ‘ग्रंथाली’च्या सदस्यांनी घेतलेली मेहनत आणि गोळा केलेली ऐतिहासिक व्यंगचित्रे ही महाराष्ट्राच्या भावी पिढीसाठी एक अमूल्य ठेवा ठरणार असल्याचे सांगितले. तसेच, ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या कार्याचा गौरव करत पुणे विद्यापीठात त्यांच्या नावाचे अध्ययन केंद्राचे काम सुरू केले असल्याचे सांगितले.कार्यक्रमाला व्यंगचित्रकार, कलाप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविधान परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपली!
Next Article पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे ऑक्टोबर २०२६ अखेर १७ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना २९१ कोटी ९१ लाख रुपयांची मदत – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

November 2, 2026

विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

November 2, 2026

फळबागा जगविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

November 2, 2026

डेन्मार्कच्या मंत्र्यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट

November 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?