Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी यशवंतभाऊ भोसले आक्रमक!

October 5, 2026

ज्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहीली गेली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे होऊन गेले त्या भाषेला दर्जाची गरज नाही, ती मुळातच अभिजात – पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर

October 4, 2026

शब्द, सूर अन् आठवणींचा सुरेल मंगेशकरी आविष्कार!

October 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी यशवंतभाऊ भोसले आक्रमक!
पिंपरी चिंचवड

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी यशवंतभाऊ भोसले आक्रमक!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

बोनस, ग्रॅज्युटी, विमा अन् समान कामासाठी समान वेतनाची मागणी; अपर कामगार आयुक्तांसोबत लवकरच बैठक

पिंपरी, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : कंत्राटी, कायम आणि हंगामी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासन व प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी कामगार नेते तथा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी केली. कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस, ग्रॅज्युटी, विमा, किमान वेतन आणि ‘समान काम, समान वेतन’ यांसह विविध हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संत तुकाराम नगर, पिंपरी येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज सभामंडपात रविवारी (दि. ४) राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंत्राटी, कायम व हंगामी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

२०२५-२६ चा बोनस दिवाळीपूर्वी द्या

सन २०२५-२६ चा बोनस कायद्यानुसार दिवाळीपूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात यावा. तसेच सेवेतून निवृत्त झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमानुसार ग्रॅज्युटी व बोनसचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी भोसले यांनी केली.

सफाई कर्मचारी, नर्सेससाठी पाच लाखांचा विमा

सफाई कर्मचारी आणि नर्सेस यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता त्यांना किमान पाच लाख रुपयांपर्यंतची विमा पॉलिसी देण्यात यावी. या विमा योजनेत त्यांच्या कुटुंबीयांनाही लाभ मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली.

कंत्राटदारांकडून वेतनशोषण थांबवा

स्थानिक स्वराज्य संस्थांनी निश्चित केलेल्या किमान वेतन दराप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन न देणाऱ्या तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे शोषण करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी. कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार पूर्ण वेतन मिळेल, याची प्रशासनाने खात्री करावी, असे भोसले यांनी सांगितले.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना ४५० चौ. फुटांची घरे द्या

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना ४५० चौरस फुटांचे घर उपलब्ध करून द्यावे. औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालय तसेच एनजीटीच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांना आवश्यक आरोग्य व सुरक्षा साधने उपलब्ध करून द्यावीत. वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचारांची सुविधाही उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

‘समान काम, समान वेतन’ लागू करा

महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार ‘समान काम, समान वेतन’ लागू करावे. महापालिकेतील कायम कर्मचाऱ्यांना ज्या स्वरूपाचे काम व जबाबदारी आहे, त्याच स्वरूपाचे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार समान वेतनाचा लाभ मिळावा, अशी भूमिका भोसले यांनी मांडली.

शासनाकडे लेखी निवेदन; अपर कामगार आयुक्तांसोबत बैठक

पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यातील इतर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये कंत्राटी पद्धतीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना या सुविधा मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने संबंधित शासकीय विभागांना लेखी निवेदन देण्यात येणार आहे. दरम्यान, या मागण्यांबाबत अपर कामगार आयुक्त, पुणे अभय गीते यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मिळाले असल्याचे भोसले यांनी सांगितले.

कामगारांच्या विविध मागण्यांबाबत संघटनेची पुढील दिशा आणि आंदोलनाची भूमिका काय असेल, याबाबतही यशवंतभाऊ भोसले यांनी मेळाव्यात उपस्थित कंत्राटी, कायम व हंगामी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

Post Views: 0
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleज्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहीली गेली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे होऊन गेले त्या भाषेला दर्जाची गरज नाही, ती मुळातच अभिजात – पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

ज्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहीली गेली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे होऊन गेले त्या भाषेला दर्जाची गरज नाही, ती मुळातच अभिजात – पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर

October 4, 2026

शब्द, सूर अन् आठवणींचा सुरेल मंगेशकरी आविष्कार!

October 4, 2026

पीपल एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त पदी अण्णा बनसोडे यांची निवड योग्य – रामदास आठवले

October 3, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी यशवंतभाऊ भोसले आक्रमक!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 5, 20260

बोनस, ग्रॅज्युटी, विमा अन् समान कामासाठी समान वेतनाची मागणी; अपर कामगार आयुक्तांसोबत लवकरच बैठक पिंपरी,…

ज्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहीली गेली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे होऊन गेले त्या भाषेला दर्जाची गरज नाही, ती मुळातच अभिजात – पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर

October 4, 2026

शब्द, सूर अन् आठवणींचा सुरेल मंगेशकरी आविष्कार!

October 4, 2026

पीपल एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त पदी अण्णा बनसोडे यांची निवड योग्य – रामदास आठवले

October 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?