Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापरातून सार्वजनिक जागेला आकर्षक स्वरूप
पिंपरी चिंचवड

टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापरातून सार्वजनिक जागेला आकर्षक स्वरूप

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वाघेश्वर घाट परिसराचे सुशोभीकरण

पिंपरी: २१ सप्टेंबर २०२६: स्वच्छतेची सवय आणि सौंदर्यदृष्टीची जोड मिळाल्यास सार्वजनिक परिसराचे रूप पालटू शकते, याचा प्रत्यय वाघेश्वर घाट परिसरात आला. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ३ मधील साठे नगर, चऱ्होली बु. येथील वाघेश्वर घाट परिसरात स्वच्छता आणि सुशोभीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला.

“सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, स्वच्छता उपक्रमात नागरिकांचा सक्रीय सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे”.

स्वच्छतेसोबतच उपलब्ध जागांचे सुशोभीकरण आणि टाकाऊ वस्तूंचा सर्जनशील पुनर्वापर केल्यास परिसराचा संपूर्ण चेहरामोहरा बदलू शकतो. स्वच्छ, सुंदर पिंपरी चिंचवड घडविण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

स्वच्छता (लक्ष्य क्षेत्रांतर्गत) परिसरातील रस्त्यालगत तसेच सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा आणि अस्वच्छता दूर करण्यात आली. उपलब्ध सार्वजनिक जागेची स्वच्छता करून तिचे सुशोभीकरण करण्यात आले. नागरिकांनी वापरात नसलेल्या तसेच टाकून दिलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करून त्यांना रंगरंगोटी करण्यात आली. या वस्तूंचा कलात्मक वापर करून परिसराला आकर्षक स्वरूप देण्यात आले.

“‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयीची जाणीव अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे या सवयी नागरिकांनी अंगीकारणे आवश्यक आहे. नागरिक, विद्यार्थी आणि विविध संस्थांच्या सहभागातून स्वच्छतेची ही चळवळ अधिक व्यापक होईल,” असे

              ……उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, पिंपरी चिंचवड मनपा.

स्वच्छतेसोबतच सार्वजनिक जागेच्या सौंदर्यीकरणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे परिसराचे रूप पालटले. टाकाऊ वस्तूंचाही कल्पकतेने पुनर्वापर करून सार्वजनिक जागा अधिक आकर्षक करता येते, याचा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी नागरिकांना ओला व सुका, सॅनिटरी, विशेष काळजी योग्य कचरा स्वतंत्रपणे संकलित करून महापालिकेच्या घंटागाडीतच देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच स्वच्छता उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअनधिकृत केबल्स तात्काळ हटवा अन्यथा कठोर कारवाईचा आयुक्त यांचा इशारा; नियमांचे पालन करून महापालिकेस सहकार्य करण्याचे केबल ऑपरेटर्सना आवाहन
Next Article वाकडमध्ये तरुणाचा खून; तिघांना अटक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?