Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी चिंचवड महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाच्या विकेंद्रीकरणासाठी जागा केल्या प्रस्तावित
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाच्या विकेंद्रीकरणासाठी जागा केल्या प्रस्तावित

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 13, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुर्गंधविरहित ट्रान्स्फर स्टेशनसह विविध प्रकल्प उभारणार

पिंपरी, दि. १३ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शाश्वत आणि विकेंद्रित पद्धतीने करण्यासाठी महानगरपालिकेने विविध भागांतील जागा प्रस्तावित केल्या आहेत. मोशी कचरा डेपोवरील कचऱ्याचा वाढता भार लक्षात घेता, प्रभाग स्तरावर घनकचरा व्यवस्थापनाची यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

मोशी कचरा डेपो येथे घनकचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध जागा अपुरी पडत असल्याने शहरातील विविध भागांतून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रभागनिहाय विकेंद्रीकरण करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने महानगरपालिकेच्या आरक्षित जागांची स्थळपाहणी करण्यात आली असून, प्राथमिक स्तरावर काही जागा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

प्रस्तावित जागांवर त्यांच्या क्षेत्रफळानुसार विविध प्रकारच्या घनकचरा प्रक्रिया सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये कचऱ्याचे वर्गीकरण व पुनर्वापर, ऊर्जा निर्मिती, जैविक कचऱ्यापासून बायोगॅस व बायोफ्युएल निर्मिती तसेच प्लास्टिक कचऱ्यापासून विविध उत्पादने तयार करण्याच्या सुविधांचा समावेश असेल.

सदर जागांची तांत्रिक योग्यता, उपलब्ध क्षेत्रफळ, वाहतूक व्यवस्था, पर्यावरणीय बाबी आणि इतर आवश्यक निकषांची तपासणी सुरू आहे. संबंधित सर्व बाबींचा अभ्यास करून तसेच आवश्यक त्या संमती व मान्यता प्राप्त करून अंतिम जागा निश्चित करण्यात येणार आहेत.

या विकेंद्रित व्यवस्थेमुळे कचऱ्याची वाहतूक अधिक कार्यक्षम होण्यास, मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यास तसेच शहरातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया व विल्हेवाट लावण्यास मदत होणार आहे.

प्रस्तावित करण्यात आलेल्या जागा….

🔴प्रभाग क्रमांक १३ मधील सेक्टर क्रमांक २२ येथे पाण्याच्या टाकीजवळ

🔴प्रभाग क्रमांक १७, चिंचवड, आरक्षण क्र. १/८९, सर्व्हे नं. ११३, ११४ व ११६ पैकी

🔴प्रभाग क्रमांक १८, चिंचवड, आरक्षण क्र. २२१

🔴प्रभाग क्रमांक १०, दत्तनगर, राम मंदिराजवळ

🔴सर्व्हे नं. ७७, दिघी गायरान

🔴चोविसावाडी, आरक्षण क्र. २/१६

🔴 पुनावळे, सर्व्हे नं. २३/६/३ पै., २३/६/२ पै., २३/५ पै., २३/१ पै., २३/६/४ पै., २३/२/१ पै. व २३/२/२

🔴पुनावळे, सर्व्हे नं. २६/१/६, २६/३/१ व २६/३/२ पै.

🔴गवळीमाथा

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील जागेबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.

“पिंपरी चिंचवड शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विकेंद्रीकरणावर भर देण्यात येत आहे. मोशी डेपोवरील कचऱ्याचा भार कमी करण्यासोबतच कचऱ्याचे संकलन, वाहतूक, वर्गीकरण आणि प्रक्रिया अधिक कार्यक्षम पद्धतीने करण्याचे नियोजन आहे. प्रस्तावित जागांची तांत्रिकदृष्ट्या तपासणी करून या जागांची अंतिम निश्चिती महापौर, सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नगरसदस्य यांच्या संमतीने केली जाणार आहे. पर्यावरणपूरक आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, अशा पद्धतीने या प्रकल्पांची उभारणी करण्यात येईल”

…..डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

प्रस्तावित जागांच्या क्षेत्रफळानुसार तेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्गंधविरहित ट्रान्स्फर स्टेशन, मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी (MRF), बायोगॅस, बायोफ्युएल तसेच प्लास्टिकपासून उपयुक्त उत्पादने तयार करण्यासंदर्भातील विविध प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. प्रत्येक जागेची तांत्रिक व व्यवहार्यता तपासणी सुरू असून सर्व संबंधित बाबींचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

….विक्रांत बगाडे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमद्यधुंद PMPML बसचालकाचा मेट्रोच्या कंपाऊंडला धडक
Next Article विद्यार्थ्यांच्या हातून साकारला पर्यावरणपूरक बाप्पा!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?