Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मालमत्ता कर वसुलीला गती देऊन थकबाकीदारांवर नियोजनबद्ध कारवाई करा – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर
पिंपरी चिंचवड

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन थकबाकीदारांवर नियोजनबद्ध कारवाई करा – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. १० सप्टेंबर …. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने १३०० कोटींचे मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थकबाकीदारांवर नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिले. विशेषतः बिगरनिवासी व औद्योगिक मालमत्तांच्या थकबाकी वसुलीला प्राधान्य देत स्वतंत्र वसुली पथके तयार करून कारवाईची प्रक्रिया सुरू करावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या मालमत्ता कर वसुलीच्या अनुषंगाने आढावा बैठक आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सांडभोर बोलत होत्या. बैठकीला उपायुक्त सचिन पवार यांच्यासह कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रशासन अधिकारी, मुख्य कार्यालयातील अधिकारी, सर्व १८ क्षेत्रीय कार्यालयांतील मंडल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त सांडभोर म्हणाल्या, ज्या मालमत्ताधारकांना मालमत्ता कराची बिले बजावण्यात आली आहेत, मात्र अद्याप कराचा भरणा करण्यात आलेला नाही, अशा मालमत्तांची स्वतंत्रपणे नोंद घेण्यात यावी. संबंधित मालमत्ताधारकांशी संपर्क साधून कर भरण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करावे. तसेच थकबाकी वसुलीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असेदेखील त्यांनी सांगितले. ३० सप्टेंबरपर्यंत कर वसुलीच्या मोहिमेला विशेष गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तसेच बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र, मोकळ्या जागा तसेच इतर मालमत्ताधारकांची यादी तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच, ज्या मालमत्ताधारकांकडे मालमत्ता कराची थकबाकी आहे, त्यांना ३० सप्टेंबरपूर्वी नोटिसा बजावून, १ ऑक्टोबरपासून जप्तीची कारवाई सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर वसुलीचे सूक्ष्म नियोजन करावे. कोणत्या प्रकारच्या मालमत्तांकडून किती थकबाकी आहे, कोणत्या मालमत्ताधारकांना बिले बजावण्यात आली आहेत आणि अद्याप भरणा झालेला नाही, याची माहिती अद्ययावत ठेवून त्यानुसार वसुलीची कार्यवाही करावी, असेही अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांनी स्पष्ट केले.

आतापर्यंत ५८४ कोटी ४९ लाख रुपयांचा भरणा

महापालिकेने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी मालमत्ता कर वसुलीचे १३०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. १ एप्रिल २०२६ ते १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १२ वाजेपर्यंत ५८४ कोटी ४९ लाख ४५ हजार २२८ रुपयांचा मालमत्ता कर भरणा झाला आहे. महापालिकेच्या वतीने मालमत्ता कर वेळेत भरणाऱ्या नागरिकांसाठी सवलत योजना लागू करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मालमत्ता कर ऑनलाइन भरल्यास सामान्य करावर ४ टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता शेवटचे २० दिवस शिल्लक आहेत.

ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही, त्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता ऑनलाइन पद्धतीने कराचा भरणा करावा आणि ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले आहे. अधिकाधिक नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरून सवलत योजनेचा लाभ घ्यावा, तसेच महापालिकेच्या कर वसुली प्रक्रियेस सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleॲड. राजेश राजपुरोहित यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वकील पॅनेलवर नियुक्ती
Next Article पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सवासाठी १११ गणेश मंडळांना परवाने; विसर्जनासाठी १०४ ठिकाणांची व्यवस्था
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?