Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मुंबई»कागल येथील ‘शाहू सृष्टी’ जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई

कागल येथील ‘शाहू सृष्टी’ जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 2, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई, दि. १ सप्टेंबर: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव त्यांचे कार्य, विचार आणि सामाजिक सुधारणांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कागल येथे जागतिक दर्जाची ‘शाहू सृष्टी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ‘शाहू सृष्टी’ केवळ संग्रहालय न राहता इतिहास, संस्कृती, शिक्षण, पर्यटन आणि निसर्ग यांची सुंदर सांगड घालणारे जागतिक दर्जाचे आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.

मंत्री मुश्रीफ यांच्या दालनात या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. कागल नगरपालिका आणि राज्य शासनाच्या निधीतून साकारण्यात येणारा हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी नगरपालिकेची सुमारे २० एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे. याबाबत थ्रीडी आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, कागलचे उपनगराध्यक्ष जयवंत रावण, मुख्याधिकारी अजय पाटणकर, शाहू कारखाना संचालक युवराज पाटील, विक्रमसिंह घाटगे बँकेचे संचालक एम. पी. पाटील, पाणी पुरवठा सभापती प्रकाश गाडेकर, आनंदा पसारे, गजानन माने, शिवाजी मोरे, भिकाजी देवकर, विकास पाटील आदी उपस्थित होते.

हा प्रकल्प मंत्री हसन मुश्रीफ आणि राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून उभा राहणार आहे. प्रस्तावित सुविधा आणि विकास आराखड्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रस्तावित ‘शाहू सृष्टी’मध्ये शाहू महाराजांच्या जीवनकार्याची आणि सामाजिक विचारांची आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मांडणी करणारे जीवनकार्य आणि वारसा, तसेच पर्यटकांसाठी विविध सुविधा असलेला पर्यटक सुविधा क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. संग्रहालय, ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती, डिजिटल माहिती केंद्र, प्रदर्शन दालने, अॅम्फिथिएटर, स्थानिक खाद्यपदार्थ व स्मृतिचिन्हांची दुकाने, साहसी उपक्रमांसाठी अडव्हेंचर पार्क, क्लब हाऊस, पर्यटन निवासाची सुविधाही प्रस्तावित आहे.

शाहू महाराजांचे शिक्षण, सामाजिक न्याय, आरोग्य, कला, क्रीडा, उद्योग आणि लोककल्याण यातील योगदान तसेच त्यांचे दूरदृष्टीपूर्ण विचार आधुनिक आणि अनुभवाधारित पद्धतीने पर्यटक व विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात येणार आहेत. त्यासाठी संशोधन, अध्ययन आणि विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी स्वतंत्र प्रशासकीय व शैक्षणिक केंद्राचीही संकल्पना मांडण्यात आली आहे.

‘शाहू सृष्टी’च्या विकासाला व्यापक स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोरही प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कागलच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्याबरोबरच राजर्षी शाहू महाराजांचा समतावादी आणि पुरोगामी विचार देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. सादरीकरण शाहू सृष्टीचे आर्किटेक्ट आदित्य बेगमपुरे यांनी केले.

‘शाहू सृष्टी’मध्ये इतिहास, शिक्षण, पर्यटन आणि मनोरंजनाचा अनोखा संगम

• राजर्षी शाहू महाराजांचे जीवन, कार्य, सामाजिक विचार आणि सुधारणांचा प्रवास आधुनिक पद्धतीने पर्यटकांसमोर मांडला जाणार.

• आधुनिक संग्रहालय- आधुनिक प्रदर्शन तंत्रज्ञान आणि अनुभवाधारित मांडणीच्या माध्यमातून शाहू महाराजांचे जीवनकार्य व सामाजिक योगदान उलगडले जाणार.

• संग्रहालयाच्या परिसरात महाराणी लक्ष्मीबाई जलाशय (राधानगरी धरण) आणि रंकाळा तलावाच्या प्रतिकृती साकारण्यात येणार.

• परिसराचे प्रमुख आकर्षण म्हणून शाहू महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या वास्तूंच्या प्रतिकृतीही साकारल्या जाणार.

• शाहू महाराजांचे जन्मस्थान आणि जीवनप्रवासाशी संबंधित वास्तूंच्या प्रतिकृती उभारण्यात येणार.

• शाहू महाराजांच्या विविध क्षेत्रांतील योगदानाची आधुनिक आणि अनुभवाधारित पद्धतीने मांडणी केली जाणार.

• पर्यटकांच्या सोयीसाठी विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार.

• झिपलाइन, रोप-कोर्स आणि इतर साहसी उपक्रमांची सुविधा प्रस्तावित.

• बँक्वेट हॉल, प्रशस्त लॉन, रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, जीम, इनडोअर गेम्स अशा सुविधा आहेत.

• कॉटेज, डॉर्मिटरी तसेच निसर्गरम्य परिसरात पर्यटकांच्या निवासासाठी विविध सुविधा उपलब्ध होणार.

• पर्यटकांसाठी खाद्यपदार्थांची व्यवस्था तसेच स्थानिक उत्पादने व स्मृतिचिन्हांच्या विक्रीची सुविधा.

• कला, संस्कृती आणि विविध कार्यक्रमांसाठी खुल्या रंगमंचाची सुविधा प्रस्तावित.

• संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात हिरवाई विकसित करून निसर्गाशी सुसंगत वातावरण निर्माण केले जाणार.

• शाहू महाराजांच्या विचारांचे अध्ययन, संशोधन आणि समाजजागृतीसाठी स्वतंत्र प्रशासकीय व शैक्षणिक केंद्र विकसित केले जाणार.

• शाहू महाराजांच्या कार्याची माहिती डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

• विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी बहुउद्देशीय सभागृहाची सुविधा असेल.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleऔषध निरीक्षक परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी वैयक्तिक आरोपांवर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचे स्पष्टीकरण
Next Article सुट्या खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महिला व बालकांचे हक्क व कल्याण समितीकडून मुंबईतील वसतिगृहे, अनाथालयाची पाहणी

September 2, 2026

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीचे मॅपिंग करून शेतीचा अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्या – कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल

September 2, 2026

प्रधान सचिव विनीता वेद सिंगल यांची अपर मुख्य सचिवपदी पदोन्नती

September 2, 2026

सुट्या खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?