Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मुंबई»ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीतबद्ध गीतांची ‘शब्द सुरांची मैफल’
मुंबई

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीतबद्ध गीतांची ‘शब्द सुरांची मैफल’

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 31, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई, प्रतिनिधी : ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांचा सुरेल आविष्कार रसिकांना अनुभवता यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ‘शब्द सुरांची मैफल’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई – ४०००२५ येथे होणार आहे.

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या प्रदीर्घ आणि समृद्ध संगीत कारकिर्दीचा गौरव करण्यासोबतच त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा सांगीतिक वारसा रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी संगीत क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संगीतशैलीने स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या अशोक पत्की यांच्या विविध लोकप्रिय गीतांचा सांगीतिक प्रवास या मैफलीच्या माध्यमातून उलगडणार आहे.

या कार्यक्रमास पद्मश्री अशोक सराफ, निवेदिता जोशी-सराफ, साधना सरगम आणि स्वप्नील बांदोडकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमात धनंजय म्हसकर, अनघा पेंडसे, प्राजक्ता सातार्डेकर आणि अभिषेक नलावडे हे गायक आपल्या सादरीकरणातून अशोक पत्की यांच्या संगीतबद्ध गीतांना सुरेल उजाळा देणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन मयुरेश साने करणार आहेत. कार्यक्रमाच्या वाद्यवृंदामध्ये तबला – मयुरेश शेर्लेकर, ढोलकी व हँडसॉनिक – जयंता बगाडे, ऑक्टोपॅड – सिद्धार्थ कदम, बासरी – संदीप कुलकर्णी, कीबोर्ड – झंकार कानडे व अक्षय कावळे यांचा सहभाग राहणार आहे. हार्मोनियम आणि संगीत संयोजन विनय चेऊलकर यांचे आहे. गायक आणि वादकांच्या सुरेल सादरीकरणातून अशोक पत्की यांच्या संगीतबद्ध गीतांचा समृद्ध ठेवा रसिकांसमोर सादर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशातील संगीतपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याबरोबरच ज्येष्ठ व मान्यवर कलाकारांच्या कलाकृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या प्रदीर्घ आणि समृद्ध संगीत कारकिर्दीचा गौरव करण्यासोबतच त्यांच्या संगीतबद्ध गीतांचा सांगीतिक वारसा रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत संगीत, नाट्य, लोककला आणि विविध सांस्कृतिक कलाप्रकारांच्या जतन, संवर्धन व प्रसारासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

‘शब्द सुरांची मैफल’ या कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार असून, प्रवेश विनामूल्य आहे. मुंबईतील संगीतप्रेमी, कलारसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीतबद्ध गीतांची ही विशेष मैफल अनुभवावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleछत्रपती शिवरायांच्या विचारांवरनवी दिल्लीत राष्ट्रीय चर्चासत्र
Next Article विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबत मानसिक आरोग्याचे संगोपनही गरजेचे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना २९१ कोटी ९१ लाख रुपयांची मदत – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

November 2, 2026

विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

November 2, 2026

फळबागा जगविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

November 2, 2026

डेन्मार्कच्या मंत्र्यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट

November 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?