Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहीली गेली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे होऊन गेले त्या भाषेला दर्जाची गरज नाही, ती मुळातच अभिजात – पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर

October 4, 2026

शब्द, सूर अन् आठवणींचा सुरेल मंगेशकरी आविष्कार!

October 4, 2026

पीपल एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त पदी अण्णा बनसोडे यांची निवड योग्य – रामदास आठवले

October 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»शब्द, सूर अन् आठवणींचा सुरेल मंगेशकरी आविष्कार!
पिंपरी चिंचवड

शब्द, सूर अन् आठवणींचा सुरेल मंगेशकरी आविष्कार!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 4, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गीतांच्या निर्मिती मागील आठवणी, रंजक किस्से आणि सुरेल सादरीकरणाने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह भारावले

पिंपरी : ५ ऑक्टोबर २०२६: शब्दांमधील भाव जाणून घेत त्यांना स्वरांची साथ देत जन्माला आलेली गाणी आणि त्या गीतांच्या निर्मितीमागच्या असंख्य आठवणी… कधी गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या स्वरांची आठवण, तर कधी आशा भोसले यांच्या गायकीचा संदर्भ, कधी शांता शेळके आणि सुरेश भट यांच्या शब्दांमागच्या कथा… अशा शब्द-सूर-आठवणींच्या त्रिवेणीने पं. हृदयनाथ मंगेशकर प्रस्तुत ‘गाणी मंगेशकरांची’ ही मैफल रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली.

अभिजात मराठी भाषेचा जागर घडविण्यासह मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे हा सांगीतिक कार्यक्रम झाला.

पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांनी संपूर्ण प्रेक्षागृह सुरांनी भारून गेले. ‘माझ्या सारंगा’, ‘गोमू माझ्या तू संगतीने’, ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’, ‘चांदण्यात फिरताना’, ‘धरला तू माझा हात’, ‘मी डोलकर डोलकर’, ‘डोलकर दर्याचा राजा’, ‘घर पाण्यावरी’, ‘बंदराला करतो ये-जा’, ‘माझे रानी, माझे मोगा’, ‘तुजे डोळ्यांत शोधता ठाव’ आणि ‘मोगरा फुलला’ अशा एकाहून एक लोकप्रिय गीतांनी रसिकांना सुरांच्या भावविश्वात चिंब भिजवले.

या गीतांचे सादरीकरण हे या मैफलीचे वैशिष्ट्य ठरलेच; मात्र त्यामागील कथा आणि आठवणींनी कार्यक्रमाला वेगळीच उंची दिली.

एखाद्या गीताची रचना कशी सुचली, शब्दांमधील भाव ओळखून त्याला चाल कशी लाभली, संगीतबद्ध करताना कोणते प्रसंग घडले, अशा अनेक आठवणी पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी रसिकांशी संवाद साधत उलगडल्या. त्यामुळे ऐकलेली गाणी पुन्हा ऐकताना त्यामागील भावविश्व जाणून घेण्याची नवी दृष्टी रसिकांना मिळाली.

 मंगेशकर, आशा भोलतासले यांच्या आठवणींसह शांता शेळके, सुरेश भट यांच्या गीतनिर्मितीचा रंजक प्रवास……

ज्येष्ठ गायिका भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर आणि ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्यासोबतच्या सांगीतिक प्रवासातील आठवणी सांगताना पं. हृदयनाथ मंगेशकर भावुक झाले. दोन्ही बहिणींसोबत काम करतानाचे अनुभव, त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांपासून ते गाण्याच्या सादरीकरणापर्यंतचे अनेक किस्से त्यांनी रसिकांसमोर मांडले. कवयित्री शांता शेळके आणि गझलकार सुरेश भट यांच्या शब्दांमागील भावविश्व उलगडताना गीतनिर्मितीच्या प्रक्रियेतील अनेक रंजक प्रसंगही त्यांनी सांगितले.

‘अभिजात मराठी’ ही केवळ भाषेची संकल्पना नसून शब्द, आशय, काव्य आणि संगीत यांच्या समृद्ध परंपरेचा अनुभव आहे, याची प्रचिती या मैफलीतून आली. मराठीतील अभिजात शब्दवैभवाला अभिजात संगीताची जोड देत सादर झालेल्या गीतांनी रसिकांच्या मनात भावनांचे अनेक पदर उलगडले. शब्दांचा अर्थ, त्यातील सूक्ष्म भाव आणि स्वरांची ताकद यांचा सुरेख मिलाफ या मैफलीत अनुभवायला मिळाला.

गायिका विभावरी आपटे-जोशी यांनी आपल्या भावपूर्ण गायकीने या गीतांना सुरेल साज चढवला. त्यांच्या स्वरांनी ‘माझ्या सारंगा’पासून ‘मोगरा फुलला’पर्यंत प्रत्येक गीताचे भावविश्व जिवंत केले. प्रत्येक सादरीकरणानंतर रसिकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद मैफलीची रंगत वाढवत होती.

तबला साथ डॉ. राजेंद्र दुरकर आणि विक्रम भट, रिदमवर अजय अत्रे, बासरीवर अमर ओक, सिंथेसायझरवर दर्शना जोग यांनी केली. केदार परांजपे यांनी संगीत संयोजन केले.या कार्यक्रमाला भारती मंगेशकर, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायिका सावनी रवींद्र यांची देखील विशेष उपस्थिती होती.

 

…

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपीपल एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त पदी अण्णा बनसोडे यांची निवड योग्य – रामदास आठवले
Next Article ज्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहीली गेली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे होऊन गेले त्या भाषेला दर्जाची गरज नाही, ती मुळातच अभिजात – पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

ज्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहीली गेली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे होऊन गेले त्या भाषेला दर्जाची गरज नाही, ती मुळातच अभिजात – पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर

October 4, 2026

पीपल एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त पदी अण्णा बनसोडे यांची निवड योग्य – रामदास आठवले

October 3, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

ज्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहीली गेली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे होऊन गेले त्या भाषेला दर्जाची गरज नाही, ती मुळातच अभिजात – पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 4, 20260

अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मानपत्र देऊन…

शब्द, सूर अन् आठवणींचा सुरेल मंगेशकरी आविष्कार!

October 4, 2026

पीपल एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त पदी अण्णा बनसोडे यांची निवड योग्य – रामदास आठवले

October 3, 2026

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणारी सराईत टोळी २४ तासांत जेरबंद

October 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?