Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने तातडीने पावले उचलावीत; आमदार अमित गोरखे
महाराष्ट्र

अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने तातडीने पावले उचलावीत; आमदार अमित गोरखे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पावसाळी अधिवेशनात उपवर्गीकरण जाहीर करा; सोलापूरमध्ये मातंग समाजाची राज्यस्तरीय बैठक

पिपरी चिंचवड,१० जून २०२६ : अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे ही काळाची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार राज्य सरकारांना उपवर्गीकरण करण्याचा अधिकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर, सकल मातंग समाजाच्या पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी सोलापूर येथे राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांनी दिली.

बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले, आरक्षणाचे ‘अ, ब, क, ड’ वर्गीकरण हा वंचित समाजघटकांच्या प्रगतीचा आणि हक्काचा विषय आहे. हरियाणा, पंजाब, तेलंगणा यांसारख्या अनेक राज्यांनी या दिशेने सकारात्मक पावले उचलली आहेत. महाराष्ट्र सरकारनेही आगामी पावसाळी अधिवेशनात यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी समस्त मातंग समाजाची आग्रही आणि न्याय्य मागणी आहे.

बैठकीतील प्रमुख मागण्या:

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचावा यासाठी उपवर्गीकरणाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी. जर शासनाकडून तातडीने पावले उचलली गेली नाहीत, तर समाजाच्या वतीने आगामी काळात लोकशाही आणि सनदशीर मार्गाने राज्यभर विविध आंदोलने व मोर्चे काढण्यात येतील.

या राज्यस्तरीय बैठकीला आणि पत्रकार परिषदेला माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार सुधाकर भालेराव, विष्णू कसबे (लहुजी शक्ती सेना), अजिंक्य चांदणे (डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया), सुरेश पाटोळे (क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना) यांच्यासह राज्यभरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि ज्येष्ठ नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“हा लढा कोणत्याही घटकाच्या विरोधात नसून, केवळ वंचित राहिलेल्या समाजबांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आहे. राज्य शासन मातंग समाजाच्या या भावनांचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. मात्र, मागणी पूर्ण होईपर्यंत आमचा हा सनदशीर मार्गानी पाठपुरावा सुरूच राहील”

– आमदार अमित गोरखे 
Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleप्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२६ साठी नामांकनांना सुरुवात
Next Article भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड…! लातूर जिल्ह्यातील बोंबळीच्या गायकवाड कुटुंबीयांना दिलासा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

राज्यातील बेकायदेशीर वृक्षतोडीचा मुद्दा विधान परिषदेत; आमदार अमित गोरखे यांच्या तारांकित प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

दि चिल्ड्रेन एड सोसायटी नियामक मंडळाची बैठक मुंबई, प्रतिनिधी: दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या मुंबई शहरात…

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?