Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»पालखी मार्गांचे हरितीकरण एक लोकचळवळ बनवू या – मंत्री ॲड.आशिष शेलार
महाराष्ट्र

पालखी मार्गांचे हरितीकरण एक लोकचळवळ बनवू या – मंत्री ॲड.आशिष शेलार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 9, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

निर्मल वारी-हरित वारी उपक्रमाला वेग; पर्यावरण संवर्धनाला चालना

मुंबई, दि.९ जून : आषाढी वारीच्या परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देऊन राज्यातील पालखी मार्गांचे व्यापक हरितीकरण करण्यास शासन कटीबद्ध आहे. हा उपक्रम शासन, अध्यात्मिक संस्था आणि लोकसहभागाच्या माध्यमातून एक लोकचळवळ म्हणून राबविण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी निर्मल वारी आणि हरित वारी उपक्रमाच्या आढावा बैठकीत दिले.

बैठकीत पालखी मार्गांवरील वृक्षारोपण आणि हरितीकरणाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पालखी मार्गावर वृक्ष संवर्धनासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, यासाठी पंढरपूर संस्थानचे विश्वस्त तथा संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिवाजीराव मोरे यांनी केलेल्या विनंतीची प्राधान्याने दखल घेत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या उपक्रमाचे मार्गदर्शक शिवाजी महाराज मोरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभिजीत औटे, वन विभागाचे विवेक खांडेकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सेवा सहयोग फाउंडेशनचे अतुल नागरस व नरेंद्र वैशंपायन हेदेखील उपस्थित होते.

राज्यातील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांवर वारकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हरित पट्टे विकसित करण्यात येत आहेत. क्रिकेटच्या सामन्यादरम्यान जेवढे डॉट बॉल पडतील, तेवढे वृक्ष लावण्याचा लोकहितकारी उपक्रम मुंबई क्रिकेट असोसिएशनने हाती घेतला आहे. या उपक्रमातूनही या पालखी मार्गाचे हरितीकरण शक्य असल्याची सूचना मोरे यांनी यावेळी केली. त्यानुसार मंत्री ॲड. शेलार यांनी तात्काळ मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून वृक्ष लागवडीसाठी पालखी मार्गांचा विचार प्राधान्याने करण्याची सूचना केली. त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाचा सामना आणि ग्रामीण रोजगार निर्मितीच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. या मोहिमेच्या माध्यमातूनही पालखी मार्गाचे हरितीकरण शक्य असल्याची सूचना मोरे यांनी केली. त्यांच्या याही सूचनेची दखल घेत मंत्री ॲड. शेलार यांनी वरिष्ठ सनदी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांच्याशी संपर्क साधून वृक्ष लागवडीसाठी पालखी मार्गांचा विचार प्राधान्याने करण्याची सूचना केली.

यावेळी मंत्री ॲड. शेलार म्हणाले, राज्यात पायाभूत सुविधा उभारताना वृक्ष कापावे. लागल्यास, संबंधित विकासकास अन्यत्र वृक्षलागवड करणे अनिवार्य असते. अशा प्रकारच्या वृक्ष लागवडीच्या माध्यमातूनही पालखी मार्गांचे हरितीकरण प्राधान्याने पूर्ण केले जावे. शासन, आध्यात्मिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि वारकरी यांचा सक्रिय सहभाग घेऊन हा प्रकल्प जनहिताची लोकचळवळ म्हणून यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने या कल्याणकारी उपक्रमासाठी ना हरकत प्रमाणपत्र देऊन योग्य ते सहकार्य करावे अशा सूचना मंत्री शेलार यांनी यावेळी केल्या.

पालखी मार्गांवर सावली देणाऱ्या देशी वृक्षांच्या संवर्धनाबरोबरच त्यांची नियमित देखभाल, पाणीपुरवठा आणि संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी मंत्री शेलार यांनी दिले. या उपक्रमामुळे वारकऱ्यांना पायी वारी करताना अधिक दिलासा मिळणार असून पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळणार आहे. वारकरी परंपरा, पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभाग यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleस्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’मुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा;डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे सर्व निकाल वेळेत जाहीर
Next Article प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२६ साठी नामांकनांना सुरुवात
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

राज्यातील बेकायदेशीर वृक्षतोडीचा मुद्दा विधान परिषदेत; आमदार अमित गोरखे यांच्या तारांकित प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

दि चिल्ड्रेन एड सोसायटी नियामक मंडळाची बैठक मुंबई, प्रतिनिधी: दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या मुंबई शहरात…

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?