Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात तंबाखूमुक्ती जनजागृती कार्यक्रम
महाराष्ट्र

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात तंबाखूमुक्ती जनजागृती कार्यक्रम

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 26, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली व्यसनमुक्तीची शपथ

मुंबई, दि.२६ मे : ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. कांबळे आणि समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते व्यसनमुक्तीविषयक पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. कांबळे यांनी जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे महत्व अधोरेखित करत तंबाखूच्या व्यसनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक परिणामांबाबत माहिती दिली.

विशेषतः २० ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत असल्याचे नमूद करत डॉ. कांबळे यानी युवकांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्यासाठी जनजागृती आणि सामूहिक सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी नशाबंदी मंडळाचे चिटणीस व मुख्य संघटक अमोल स. भा. मडामे यांनी महाराष्ट्र हे २०११ मध्ये व्यसनमुक्ती धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य असल्याचे सांगितले. व्यसनमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने अधिक प्रभावी पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि धार्मिक स्थळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करण्यासाठी व्यापक जनजागृती आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमादरम्यान ‘कल्याणयात्रा – व्यसनमुक्तीच्या गाथा’ या मासिकाच्या मे २०२६ अंकाचे प्रकाशन डॉ. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच तंबाखूमुक्ती विषयक पोस्टर्सचेही प्रकाशन करण्यात आले.

डॉ. कांबळे आणि आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी विविध संस्थांच्या स्टॉलना भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. पोस्टर्स, प्रदर्शने, पत्रके आणि माहितीपर कटआऊटच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम तसेच ‘तंबाखूजन्य पदार्थ विक्री कायदा २००३’ संदर्भातील माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.

या कार्यक्रमात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, सलाम मुंबई फाऊंडेशन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, प्रजापिता ब्रह्मकुमारीज यांसह अनेक संस्थांनी सहभाग घेत व्यसनमुक्तीचा संदेश दिला. कार्यक्रमास नशाबंदी मंडळाच्या वतीने मुंबई शहर संघटक चेतना सावंत, ठाणे जिल्हा संघटक मिलिंद पाटील तसेच मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी एनसीसी महत्त्वाचे -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
Next Article ८९ हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना मिळणार पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट निर्देश मुंबई, प्रतिनिधी : भारतरत्न डॉ.…

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?